जालना जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ नवीन रुपात

जालना , दि. ११ मे २०१८: जिल्हाधिकारी कार्यालयाचे https://jalna.gov.in हे संकेतस्थळ नवीन स्वरुपामध्ये महाराष्ट्र दिना दिवशीपाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आले.
याप्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी श्री प्रकाश खपले, निवासी उपजिल्हाधिकारी श्री राजेश जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी राजु नंदकर, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी रवीकुमार पडुळकर, सर्व उप जिल्हाधिकारी, सर्व तहसीलदार आदी उपस्थित होते.
केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सुचनेनुसार देशातील सर्व जिल्ह्यांचे संकेतस्थळ एकाच स्वरुपात,‘स्वास’ प्लॅटफॉर्मवर रुपांतरीत करण्यात येत आहेत. त्यानुसार जालना जिल्ह्याचे संकेतस्थळ सुद्धा ‘स्वास’ प्लॅटफॉर्मवर बनविण्यात आले आहे. अधिक सुरक्षित, सुटसुटीत व सहज हाताळता येणाऱ्या या संकेतस्थळावर जालना जिल्ह्याविषयी सर्व माहिती, नवीन घडामोडी, पर्यटनस्थळे, विविध उपक्रम, या उपक्रमांशी निवडीत छायाचित्रे व व्हिडीओ आदी माहिती मराठी, इंग्रजी भाषेत उपलब्ध करून देण्यात आली असून ही माहिती सातत्याने अद्ययावत केली जाणार आहे.
सदर अद्ययावत संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपयुक्त माहिती दर्शनिय भागामध्येच प्रदर्शीत करण्यात आलेली आहे. जसे सार्वजनिक सुविधा, नागरी सेवा, नवीन अद्यतने, मदत क्रमांक, माध्यम दालने ही सर्व माहिती प्रथम दर्शनी उपलब्ध आहे. तसेच जालना जिल्ह्याविषयी माहिती, प्रशासकीय रचना, विविध विभागाविषयी माहिती, जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, भरती संबंधी जाहीरात, निवीदा, यांचासुद्धा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
सदर संकेतस्थळ हे द्विभाषीक आहे. भाषा बदलणे चा पर्याय वापरुन संकेतस्थाळाचे कोणतेही पेज किंवा माहीती नागरीक मराठी किंवा इंग्रजी मध्ये वाचु शकतात.
प्रभारी जिल्हाधिकारी श्री प्रकाश खपले, निवासी उपजिल्हाधिकारी श्री राजेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी रवीकुमार पडुळकर, त्यांचे सहकारी उन्मेश सपकाळ, दिपेन्द्र जैस्वाल व भुषण लोखंडे यांनी हे संकेतस्थळ तयार करण्यासाठी परिश्रम घेतले  तसेेेच महाराष्ट्र राज्य एनआयसी समन्वय समितीचे श्रीमती इरेणी ए, श्री राजेश साळवे, श्री आमोद सुर्यवंशी आणि दिल्ली एनआयसी मुख्यालय स्वास समिती यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Photo Gallery